वीज कोसळून म्हेस दगावली; सुदैवाने मनुष्य हानी नाही !

Spread the love

माजलगाव, दि.१७:  वीज पडून म्हेस दगावल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी घडली आहे. ही घटना माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथे घडली असून सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वाघोरा येथील शेतकरी सय्यद समशेर सिकंदर यांची म्हेस दररोज प्रमाणे शेतात चरत होती. आज (शुक्रवारी) दि.१७ रोजी दुपारी ३ वाजता अचानक म्हेस चरत असताना वीज पडली. यामधे ती म्हेस जागीच दगावली. यावर पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी यांनी भेट दिली असताना पंचनामा करण्यात आला. अंदाजे ९० हजार रुपये किमतीची म्हेस दगावली असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply