- भेसळ करण्यासाठीचे ९ लाखाचा रसायन साठा जप्त; अन्न व औषध पोलीस प्रशासनाची आष्टी शहरात कारवाई
झटपट बातमी:-
बीड : दूधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी भुकटी व रसायनाच्या साठा जप्त केल्याची कारवाई आष्टी येथे बीडच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून केली. यामध्ये तब्बल 8 लाख 91 हजार 375 रु. माल जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी फरार आहे. या कारवाईमुळे पांढऱ्या दुधातील भेसळीचे रॅकेट पुन्हा एकदा समोर आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील संभाजी नगर भागातील एका खोलीत दूधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी भुकटी व रसायनाचा साठा असल्याची माहिती मिळाली अन्न व औषध प्रशासन विभाग मिळाली. त्यानुसार बीडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन छापा टाकला. यामध्ये १३२ भुकटीच्या गोण्या, २२० पत्र्याचे डब्बे जप्त करण्यात आले. याचा वापर दूधात भेसळ करुन तो विकला जात.
याप्रकरणी जगदंबा मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्टचे सतीश नागनाथ शिंदे व नंदू मेमाणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदू मेमाणे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर सतीश शिंदे फरार आहे.
