आयपीएस डॉ.बी. धीरज कुमार यांच्या पथकाची कारवाई
माजलगाव, दि.१३: शहरातील पंचवटी हॉटेल, नवा मोंढा जवळ आज (सोमवारी) धाड टाकून कल्याण मटका जुगार खेळवणारे २ एजंट व खेळणारे ४ अशा ६ आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दखल केला. ही कारवाई आयपीएस डॉ.बी.धीरज कुमार यांच्या पथकाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.१३ सोमवार रोजी माजलगाव शहरात जुना मोंढा, आणि पंचवटी हॉटेल जवळ कल्याण मटका जुगार खेळवणारे २ एजंट आणि ४ जण मटका खेळणारे अशा ६ आरोपी ना मटका जुगार खेळताना पकडले आहे. एका रेड मध्ये ५ जण आरोपी विरुद्ध कल्याण मटका जुगार आणि रोख रुपये व मोबाईल असे एकूण ४९८९ रुपयांची कारवाई झाली आहे. तर दुसऱ्या रेड मध्ये १ एजंट विरुद्ध कारवाई केली असून त्याच्या कडून कल्याण मटका जुगाराचे साहित्य रोख रुपये आणि मोबाईल असे मिळून ७५९० रुपयांची कारवाई झाली आहे.
सदर कारवाई ही सहायक पोलिस अधीक्षक डॉ.बी.धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. या पथकात पोलीस नाईक नामदास, गणेश नवले, तुकाराम कानतोडे यांचा समावेश आहे.
