शेकापचे ॲड. गोले पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर
माजलगाव, दि.१४: तालुक्यातील नेमणूक असलेल्या सज्जाच्या ठिकाणी वास्तव्य न करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ॲड.नारायण गोले पाटील यांच्या सह शेतकऱ्यांनी आज (मंगळवारी) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचे कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे दि.१४ मंगळवार रोजी अमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणातून शेकापने तलाठी, मंडळाधिकारी यांनी सज्जाचे ठिकाणी वास्तव्य करुण माजलगाव शहरात बेकायदेशीर थाटलेली कार्यालय त्वरित बंद करावे. तलाठी, मंडळाधिकारी यांनी सज्जाचे ठिकाणी कार्यालय सुरू करून इतर गावांना भेटीचे वार निश्चित करून अंमलबजावणी करावी. तलाठी ,मंडळाधिकारी यांनी सज्जावर न राहता घर भाडे, डाटा भत्ता घेऊन शासनाची फसवणूक केल्याबाबत भादवी 420 नुसार गुन्हे दाखल करून सदर रक्कम शासनाने वसूल करावी. कोर्ट डिक्रीवर स्टॅम्प ड्युटी सक्तीची करून शंभर रुपयाच्या बॉण्डवर बेकायदेशीर फेरफार करणारे तलाठी, मंडळाधिकारी यांना त्वरित निलंबित करा. तलाठी, मंडळाधिकारी यांनी खाजगी कार्यालयात नेमलेल्या खाजगी व्यक्तीकडून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवावी, आदी मागण्या केल्या आहेत.
या रस्त मागण्या असताना ही मात्र उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसून येत आहे.