२० मार्च पर्यंत अंतरिम जामीनमध्ये वाढ
माजलगाव, दि.१३: अशोक शेजुल प्राणघातक हल्ला प्रकरणी माजलगाव न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके व त्यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांच्या अंतरिम जामीन कायम ठेवत दि.२० मार्च पर्यंत वाढ देण्यात आली आहे. यामुळे सोळंके दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे.
येथील भाजपचे अशोक शेजुळ यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके, मंगल प्रकाश सोळंके यांच्यासह सहा ते सात जनावर ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर दि.८ मार्च रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.जी.धर्माधिकारी यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांनी दि.१३ मार्च २०२३ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यावर आज दि.१३ सोमवारी माजलगाव न्यायालयात जामीन मांडला. न्यायदंडाधिकारी बी.जी.धर्माधिकारी यांनी पोलीसांनी मुळ अर्जावर अहवाल दाखल न केल्यामुळे अंतरिम जामीन कायम ठेवत दि.२० मार्च २०२३ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.
आमदार सोळंकेच्या वतीने ॲड.बी.आर. डक यांनी काम पाहिले.