छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : (प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत व्यवस्थापन परिषदेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात प्रथमच माजलगावला प्रतिनिधित्व करण्याची संधी डॉ.योगिता अशोक होके पाटील यांच्या रूपाने मिळाली आहे.

मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते डॉ.योगिता अशोक होके पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे आदी.
कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली सिनेट सदस्याची बैठक आज दि.१२ रविवारी पार पडली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत व्यवस्थापन परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामधे सिनेट सदस्य असलेल्या डॉ.योगिता अशोक होके पाटील यांनी पदवीधर प्रवर्गातून भाग घेतला होता. या निवडणुकीत डॉ. योगिता अशोक होके पाटील यांना ३६ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रा.अशोक मगरे यांना ३४ मते मिळाली. होके पाटील २ मताने विजयी होऊन व्यवस्थापन परिषदेवर जाणाऱ्या माजलगावच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
डॉ.योगिता अशोक होके पाटील यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
