माजलगाव नगर परिषदेवर आझाद नगर वासियांच्या ठिय्या आंदोलन

Spread the love

तात्काळ नालेसफाई करण्याची मागणी

माजलगाव, दि.९: शहरातील आझाद नगर येथील नाला तुंबल्यामुळे सांडपाणी साचून परिसरासह मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. ती तात्काळ हटवण्यासाठी नाले सफाई करण्यात यावी. या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी आज नगर परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करत नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

 

शहरातील आझाद नगर येथून सांडपाणी वाहून नेणारा मोठा नाला गेलेला आहे. मात्र या नाल्याची मागील अनेक महिन्यापासून नाल्यातील घान स्वच्छ्ता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा नाला तुंबला गेला असून सांडपाणी या भागातील नागरिकाच्या घरात, रस्त्यावर साचले आहे. या मुख्य रस्त्यालगतच्या विद्युत पुरवठा करणारी जनित्र (DP) असल्याने मोठा धोका होऊ शकतो. याबाबत वारंवार नगर परिषद प्रशासनास सांगून ही नाले सफाई झाली नाही. त्यामुळे संतप्त होऊन आज (गुरुवारी) सफाई ११.३० वाजता आझाद नगर शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडून पालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध केला.
यावेळी प्रशासक अविनाश निळेकर यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन स्वीकारत तात्काळ नाले सफाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ॲड.सय्यद याकूब, सलीम बापू सय्यद, राम गायकवाड, अशोक लांडगे, समशेर पठाण, शेख आसेफ, फारुख सय्यद, महेबुब सय्यद आदीसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply