माजलगाव, दि.८: अशोक शेजुळ प्राणघातक हल्ला प्रकरणी आज माजलगाव न्यायालयाने आमदार प्रकाश सोळंके व त्यांच्या धर्मपत्नी मंगल प्रकाश सोळंके यांना दि.१३ मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजुर केला.

येथील भाजपचे अशोक शेजुळ यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके, मंगल प्रकाश सोळंके यांच्यासह सहा ते सात जनावर ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज माजलगाव न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता. यावर माजलगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.जी.धर्माधिकारी यांनी मुळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नी मंगल प्रकाश सोळंके यांना दि.१३ मार्च २०२३ पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आमदार सोळंकेच्या वतीने ॲड.बी.आर. डक यांनी काम पाहिले.
