माजलगाव, दि.८: भाजपचे अशोक शेजुळ यांच्यावर समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला आहे. त्यात आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांची धर्मपत्नी मंगल सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून नाव गोवण्यात आले आहे. हे चुकीचे असून ती गुन्हे वापस घेण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदनाद्वारे माजलगाव मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केली आहे.
निवेदन सादर करण्यात येते की, मंगळवारी दि. 07 रोजी माजलगाव शहरात भाजपाचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काही अज्ञात समाज कटकांनी भँड हल्ला केलेला आहे. माजलगाव शहरातील आज तागायत राजकीय दोषापोटी कधीही कुणावरही जिव घेणा हल्ला झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करित आहोत. वरील घटनेचा संदर्भ देवुन माजलगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या विरोध्दात राजकीय मंडळी आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या लोकप्रियतेला छेद देण्यासाठी आ. प्रकाशदादा सोळंके तसेच त्यांच्या धर्मपत्नी मंगलताई सोळंके व रामेश्वर टवाणी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या पध्दतीचे खोटे गुन्हे दाखल करून राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा असणाऱ्या आ.प्रकाश सोळंके यांच्या सारख्या नेत्यावर चिखल फेक करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय अस्थितत्व कलंकीत होत आहे. आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या तीस-चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिंदीमध्ये त्यांच्यावर व त्यांच्या संस्थेच्या संदर्भ घेवुन अनेकांनी गंभीर आरोप केले. वर्तमान पत्रात टिका टिप्पनी केली, त्या कुठल्याही व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला झालेला नाही. अशोक शेजुळ यांच्यावर झालेला हल्ला वेगळ्या भुमीकेतुनही झालेला असु शकतो. परंतु या हल्याचा चुकीचा संदर्भ देवुन आ. प्रकाश सोळंके यांच्या राजकीय विरोधकांनी या घटनेचा दुरउपयोग करून व सत्तेचा गैरफायदा घेवुन आ. प्रकाश सोळंके व इतरावर चुकीचे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.
आ.सोळंके यांच्यासह मंगल सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यावरील दाखल खोटे गुन्हे रद्द न केल्यास माजलगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र अंदोलन करण्यात इशारा निवेदनाद्वारे उपविभगिय अधिकारी यांना आज (बुधवारी) दुपारी ३ वाजता दिला आहे. या निवेदनावर जयसिंग सोळंके, मतदार संघाचे अध्यक्ष विश्वंभर थावरे, दयानंद स्वामी, जयदत्त नरवडे, राजेश मेंडके, मनोहर डाके, बजरंग साबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.