माजलगाव, दि.७: येथील भाजप नेते अशोक शेजुळ यांच्यावर भरदिवसा सहा हल्लेखोरांनी शहरातील शाहू नगर येथे अडवून रॉडणे जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा शेजुळ यांच्या फिर्यादीवरून आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जनावर कलम ३०७, १२० ब नुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अशोक शेजुळ हे दररोज प्रमाणे आज दि.७ मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पान खाण्यासाठी आले होते. त्या ठिकाणाहून घरी परत जात असताना शाहू नगर येथील मोरेश्वर विद्यालय जवळ पाठलाग करत असलेल्या सहा हल्लेखोरांनी अडवले. त्या ठिकाणी अचानक त्यांनी रॉडने अशोक शेजुळ यांच्यावर वार करू लागले, यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता त्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. यावेळी शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक रुग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल केले आहे. यात शेजुळ हे अत्यंत गंभीर जखमी असून त्यांचे डाव्या पायाला तीन फ्रॅक्चर, उजव्या पायाला एक फ्रॅक्चर तर दोन्ही हात ही फ्रॅक्चर असून डोक्याला ही जबर मार आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या यादीवरून आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम ३०७, १२० ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.