आज माजी मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.सुजय विखे पाटील माजलगावात

Spread the love
  •  मोफत आरोग्य शिबिराचे औचित्य

माजलगाव, दि.३: माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय येथे डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व विजया अर्बन मल्टीस्टेटच्या संयुक्त विद्यमाने आज (शुक्रवारी) मोफत आरोग्य शिबिराचे शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घघाटन माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार असून अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

येथील विजया अर्बन मल्टीस्टेटच्या वतीने १० व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व विजय अर्बन मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि.३ व ४ मार्च रोजी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय येथे होणार आहे. या शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र विकार तपासणी, शस्त्रक्रिया तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेस पात्र असणाऱ्या रुग्णाच्या ॲंजिओप्लास्टी, बायपास, डोळ्याच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर, पोटाच्या व मुत खड्याच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
या शिबिरात लाभ घेण्यासाठी रुग्णांनी राशन कार्ड, आधार किंवा मतदान ओळखपत्र आदी कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांचा वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply