आडस येथील घटना
बीड, दि.२ : घरात आई व मुलगी स्वयंपाक करताना अचानक आग लागून स्फोट झाला. यामध्ये मुलगी जळून जागीच ठार झाली तर तिची आई गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज (दि.२) आडस (ता.केज) येथे ७.३० वा. दरम्यान घडली. जखमी महिलेला अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कमल आश्रुबा इंगळे (वय ३० वर्षे) रा. आडस (ता. केज) असे मयत महिलेचे नाव आहे तर गंभीर जखमी लोचनाबाई आश्रुबा इंगळे (वय ५८)असे नाव आहे. या दोन्ही नात्याने अनुक्रमे मुलगी व आई आहेत. आज गुरुवारी (दि.२) सायंकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास घरात आई लोचनाबई व मुलगी कमल ह्या दोघी मिळून स्वयंपाक करताना अचानक घरात आगीने पेट घेतला. पेटते घर पाहून आई व मुलीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक मोठा स्फोट स्फोट झाला अन् आगीने रौद्ररूप धारण केले. यात मुलगी कमल इंगळे ही जळून जागीच ठार झाली तर आई लोचणाबाई ही भाजल्याने गंभीर जखमी झाली. हा स्फोट पेट्रोलचा झाल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.