-
चिंचवडमध्ये १९ व्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप ११ हजार मतांनी आघाडीवर
राज्यातील सत्ता नात्यानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा या ठिकाणी महाविकास आघाडीने सुरुग लावला आहे. याठिकाणी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ह्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे.

राज्यातील कसबा व चिंचवड या दोन ठिकाणी विधानसभेसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. याचा आज (दि.२) गुरुवारी निकाल जाहीर झाला. यात २८ वर्षापासून भाजपला बालेकिल्ला असलेल्या कसब्यात माहविकास आघाडीने जब्बर धक्का दिला. याठिकाणी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ह्यांना ७३१९४ मते तर भाजपचे हेमंत रासने ६२२४४ मते मिळाली. यात धंगेकर हे ११ हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. तर चिंचवड मतदार संघ भाजपने कायम राखण्याची चिन्ह असून या ठिकाणी १९ व्या फेरीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप ६७ हजार ३०६ मते महाविकास आघाडीचे नाना काटे ५५ हजार ७४७ मते तर अपक्ष राहुल कलाटे २२ हजार ७७१ मते मिळाली आहेत. याठिकाणी भाजपच्या अश्विनी जगताप ११ हजार ५५९ मते घेऊन आघाडीवर आहेत. यामुळे भाजप चिंचवड मतदार राखण्यात यशस्वी होईल अशी चिन्हे आहेत.
