-
मुख्यमंत्र्यांची घोषणा; आमदार प्रकाश सोळंके यांनी वेधले होते लक्ष
मुंबई- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात प्रामुख्याने बीड जिल्ह्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना प्रश्न करून निदर्शनास आणून दिले होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मार्च पर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली.
अधिवेशनात आमदार प्रकाश सोळंके यांनी आवाज उठवत अनुदान बाबत लक्ष वेधले.केवळ सरकार मधील मंत्री ते वाटप केल्याचे सांगत आहे. मात्र आज पावतो जवाबदारी सांगतो ना सतत धार पाऊसाचे व अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ३ हजार ३०० कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या ६ हजार ८०० कोटींपैकी ६ हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी ४ हजार ७०० कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास १२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, तसेच अतिृष्टीचे व सततच्या पावसाचे अनुदान ३१ मार्च पर्यंत वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.