माजलगाव, दि.५: सध्या महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये ज्यांची जन्मतारीख १ ऑक्टोबर २००५ पूर्वीची आहे असे व्यक्ती मतदार यादीत नावनोंदणी करु शकतात. त्यामुळे वय १७ असणाऱ्या तरुणांना मतदार नावनोंदणीची संधी उपलब्ध झाली आहे.

नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी
कोणताही एक दस्तावेज हवा :
· जन्म दाखला,
· शाळा सोडल्याचा दाखला
· जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी/आठवी/दहावी/बारावी यांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका
· पॅन कार्ड
· वाहन चालक परवाना
· भारतीय पासपोर्ट
· आधार कार्ड
नाव नोंदवताना निवासाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा :
· बँक/किसान/ टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड
. आधार कार्ड
· भारतीय पासपोर्ट
· वाहन चालक परवाना
· अलीकडील भाडेकरार
· पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल (हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती आई/वडील/पती/पत्नी – यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते.)
· प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
· भारतीय टपाल विभागाद्वारे तुमच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तुम्हांला प्राप्त झालेले कोणतेही टपालपत्र. ही मतदार नोंदणी मोबाईलवरच Voter Helpline App च्या मदतीने करता येते
