माजलगाव, दि.४: श्रद्धा वालकर या मुलीच्या घृणास्पद मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. माजलगावमधील सर्व हिंदू संघटना एकवटल्या असून रविवारी सकाळी ११ वाजता हिंदू धर्मरक्षण मुक मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद व धर्मांतरण बंदीच्या मुद्द्यावरून शहरातील झेंडा चौक येथून श्रीगुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून सुरुवात करण्यात आली होती.
देशात मागील काही वर्षापासून लव जिहाद व धर्मातरण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नुकत्याच झालेल्या श्रद्धाच्या हत्तेने सर्व देश सुन्न झालेला आहे. आज हिंदू समाजातील मुली असुरक्षित झालेल्या असून शाळा महाविद्यालये लव जिहादच्या प्रकरणांना थांबवण्यामध्ये पूर्णतः अयशस्वी ठरले आहेत. यामुळे देशभरातील तमाम हिंदूच्या भावना खूप तीव्र झालेल्या असून देशात लव जिहाद व धर्मातरण विरोधी कायद्याची तात्काळ आवश्यकता आहे. तसेच माजलगाव धरण परिसरात असलेल्या शासकीय जमिनीवर काही लोकांनी अवैधरित्या मझार उभारले असून भविषयात या प्रकरणाची व्याप्ती वाढून कायदा व प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी सदरील मझारचे होत असलेले अवैध बांधकाम तात्काळ हटवण्याबाबत यंत्रणेला आदेशित करावे. तसेच लव जिहाद व धर्मांतरण विरोधी कायद्याच्या कठोर अंमलबजावणी बाबत समस्त हिंदू समाज माजलगाव च्या वतीने काढलेल्या मूक मोर्चाची दखल घेऊन लव जिहाद व धर्मातरण विरोधी कायदा लवकरात लवकर पारित करून सदरील कायद्याची कठोर अमलबजावणी करावी. या मागणीसाठी हजारो हिंदू रस्त्यावर उतरले होते, हा मोर्चा झेंडा चौक येथून हनुमान चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे समारोप झाला. यावेळी काही प्रतिनिधी यांनी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
या मोर्चात विध्यार्थी, युवक, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.