माजलगाव, दि.२७: तालुक्यातील लऊळ येथील रहिवाशी माजी पंचायत समिती सदस्य राधाकृष्ण सोनवणे (वय ५५ वर्षे) यांचे हृदविकाराच्या धक्याने सोमवारी रात्री ९ वाजता राहत्या घरी निधन झाले.

राधाकृष्ण सोनवणे हे हजरजवाबी व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. तसेच लऊळ या गावचे मागील १० ते १५ वर्षापासून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. सोनवणे यांच्या अचानक हृदयविकाराच्या धक्याणे निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.२८ मंगळवारी सकाळी १० वाजता लऊळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
