- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीचा दमडाही दिला नाही
माजलगाव, दि.२८: जिल्ह्यात सततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. यावर सरकारने केवळ नुकसान भरपाई पोटी ८१० कोटी रुपयांची घोषणाबाजी केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमडाही दिला गेला नाही. याबाबत आज (दि.२८) मंगळवारी आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानभवनात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत शिंदे – फडणवीस सरकारच्या थापेबाजी उघट करून लक्ष वेधले.
बीड जिल्ह्यात सततधार पाऊसामुळे व अतिवृष्टिमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. त्यात शिंदे – फडणवीस सरकारने मोठ्या घोषणा करून एनडीआरएफ प्रमाणे अधिक मदत शेतकऱ्यांना करत असल्याचा सरकारकडून करण्यात आला. त्यासाठी अतिवृष्टी अनुदान पोटी बीड जिल्ह्याला ४१० कोटी मंजुरी बाबत शासन निर्णय जाहीर करत निधी मंजुर केला. मात्र तो प्रत्यक्ष निधी अद्याप दिला गेला नाही. तसेच सततधार पाऊसामुळे ४०० कोटीची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्ष त्याचा ना शासन निर्णय, ना त्यासाठी निधी दिला. केवळ शिंदे व फडणवीस सरकारने सतत धार पाऊस व अतिवृष्टीच्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना दमडाही देण्यात आलेला नाही. मात्र सरकारकडून अनुदान वाटप केल्याचा गवगवा करण्यात येत आहे.
यावर आज दि.२८ मंगळवारी अधिवेशनात आमदार प्रकाश सोळंके यांनी आवाज उठवत अनुदान बाबत लक्ष वेधले.केवळ सरकार मधील मंत्री ते वाटप केल्याचे सांगत आहे. मात्र आज पावतो जवाबदारी सांगतो ना सतत धार पाऊसाचे व अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान वाटप झाले नसल्याचे ठासून सांगत. सरकारच्या थापेबजी उघड करत शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न उपस्थित करून धारेवर धरले.