-
एकच नंबरवर घेतले दोन वेगवेगळे ठराव; निलंबीत करण्याची माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांची मागणी
माजलगाव, दि.२७: येथील माजलगाव नगर परिषदमधे प्रशासकीय काळात मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी एकाच नंबर वर दोन वेगवेगळे ठराव, वेग वेगळ्या तारखेला घेतले आहेत. ते बेकायदेशीर असून त्यांच्यावर भोसले यांच्यावर नगर पालिका अधिनियमानुसार कारवाई करून निलंबीत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी सोमवारी केली आहे. यामुळे धाडसी व कामात गती असलेले विशाल ‘भोसले’ हे अखेर बोगस ठरावात ‘फसले’ गेले असल्याचे दिसून येत आहे.

माजलगाव नगर परिषद या ना त्या बोगस, अनियमितता, भ्रष्ट्राचार मुद्यावरून मागील पाच वर्षांपासून चर्चेत आहे. आ.प्रकाश सोळंके यांच्या मागणीवरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण सुरू आहे. अशा एक ना अनेक बारा भानगडीत पालिका गुरफटून गेली आहे.
त्यातच माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी प्रशासकीय काळात तत्कालीन प्रशासक असणारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी बोगस ठराव घेतले असल्याचे प्रकरण समोर आणले आहे. विशाल भोसले यांनी प्रशासकीय ठराव क्रं.५६ हा दि.२२/०९/२०२२ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मोंढा येथे १० लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे काम करणे. त्या कामाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करून, त्यानुसार काम हाती घेण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानंतर त्याच हाच ठराव क्रं. ५६ टाकून या ठरावाची दि. ३०/०८/२०२२ रोजी कार्यालयीन कर्मचारी अनिल दिगांबर दडके यांची वेतन श्रेणीत पदोन्नती देण्याकरीता सेवा पुस्तिकेमध्ये नोंद घेणे बाबत, असा ठराव घेण्यात आला. ठराव क्र.५६ हा प्रशासकीय काळात एकच आहे. तसेच परंतु ठरावाचे जुन्या डंपिंग साईटवर कचऱ्यावर बायोमिनींग प्रक्रिया करणे बाबत. डंपिंग ग्राउंडवर सदरील एजन्सी सदगुरू बागडे बाबा यांनी कोणतेही काम केलेले नाही. असे असतांना देखील ठराव क्रं.४५ दि.०६/०७/ २०२२ हा पण बोगस ठराव घेण्यात आला. त्यामुळे बोगस ठराव घेऊन व त्याची अंमलबजावणी करून तत्कालीन प्रशासक विशाल भोसले यांनी नगर पालिका प्रशासनाची दिशाभुल केली असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी केला आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता भोसले यांना नगर पालिका अधिनियमानुसार कारवाई करून तात्काळ निलंबीत करण्यासाठी शिफारस करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे.
