गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दखल

Spread the love

पुणे, दि.२६ : अल्पावधीत प्रसिद्ध झोतात आलेली लावणी नृत्यांगणा कलाकार गौतमी पाटील (Goutami Patil) हिची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लावणी कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमात तिचे कपडे बदलत असताना, तिचा पाठलाग करत असलेल्या अज्ञाताने मोबाइल कॅमेऱ्यावरुन तिची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित काढली. त्यानंतर संबंधित आरोपीने समाज मध्यामावरील दोन खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांची अशाप्रकारे अश्लील ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी समाजमाध्यमातून देण्यात आली होती. या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. लहाने करत आहे.

रुपाली चाकणकराकडून दाखल

गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गंभीर दाखल घेतली आहे. त्यांनी राज्याच्या सायबर पोलीस महानिरीक्षकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरीता थेट कृती कार्यक्रम करण्याच्या सूचना केली आहे.

Leave a Reply