धारुर : केंद्रेवाडी (ता.अंबाजोगाई) येथील सदाशिव दौलतराव वाघमारे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली. मात्र त्यातील चोरी करणारी आरोपी दुसरा तिसरा कुणी नाही निघाला, तर खुद्द सदाशिव यांची पत्नीचं ठरली आहे. त्यांनी धारूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पत्नीसह चार जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने स्वतःच्याच पत्नी विरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून जोरदार चर्चा आहे.
सदाशिव दौलतराव वाघमारे व सविता सदाशिव वाघमारे हे पती पत्नी दांपत्य केंद्रेवाडी (ता.अंबाजोगाई) येथील रहिवाशी आहेत. खुद्द पती सदाशिव दौलतराव वाघमारे ( वय ५२ वर्ष ) रा. केंद्रेवाडी यांनी त्यांच्या पत्नी सविता हिने ( दि. १२ ) फेब्रुवारी दुपारी घरातील फरशी, कपडे, टिव्ही, सोन्याचे दागिने,पत्रे आदिसह संसारोपयोगी साहित्य ज्याची अंदाजित किंमत एकूण २ लाख ७३ हजार १०० रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याची तक्रार केली. पतीनेच पत्नीच्या विरोधात चोरीची तक्रार केल्याने प्रथम पोलीसच अचंबित झाले होते. परंतु या तक्रारीवरुन गुरुवारी अखेर आरोपी पत्नी सविता सदाशिव वाघमारे रा. केंद्रेवाडी ( ता. अंबाजोगाई ), गोरखनाथ रामचंद्र तरकसे, दादाराव अच्युत मिसाळ रा. धावडी, सिध्देश्वर अभिमान केंद्रे यांच्यावर धारुर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पो. उपनिरीक्षक गोविंद बास्टे हे करीत आहेत.
पतीच्या तक्रारीवरून पत्नीवर चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने, मात्र परिसरात खूपच चर्चा होऊ लागली आहे.