राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा संघर्ष मागील अनेक दशकापासून होता. अखेर हा प्रश्न शिंदे – फडणवीस सरकारने मार्गी लावला. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता देत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशीव नामांतराच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजुरी देत.
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा मुद्दा अखेर आज निकाली निघाल. राज्य सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला नामांतराचा प्रश्न मार्गी लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशीव’ करून दाखवले आहे. या निर्णयाचे राज्य भरातून स्वागत होत आहे.