- मतदार यादी सादर करण्याचे प्रादेशिक सहसंचालकाचे आदेश
माजलगाव, दि.२४ : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव ची निवडणूक प्रक्रीया प्रादेशिक सहसंचालक (साखर) औरंगाबाद यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालक औरंगाबाद यांनी कारखान्याला निवडणूक निधी भरणा करण्याबाबत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यकारी संचालकांना आदेशीत केलेले आहे. शिवाय वैयक्तीक सभासद मतदार यादी, संस्था मतदार यादी मंजूर करून २४ फेब्रुवारी २०२३ रोजी समक्ष सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक एप्रिल / मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
उपप्रादेशिक कार्यालयायातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ आणि १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणूक पात्र कृषी पतसंस्था व बहु उद्देशीय
सहकारी संस्था इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, सर्व प्रशासक, प्रशासक मंडळ नियुक्त सहकारी संस्था, हंगामी कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्था यांच्या निवडणूक प्रक्रीया सुरु कराव्यात व अशा स्वरूपाच्या मतदार याद्या १ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर तयार कराव्यात अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या संस्था मतदार याद्या सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत, अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्थत्त अधिनियम १९६० नियम १९६१ व महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम २०१४ अंतर्गत कारवाई करावी, असे सुचित केलेले आहे.