निवडणूक आयोगच बरखास्त करा – उद्धव ठाकरे

Spread the love

निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत दिलेला निर्णय हा अन्यायकारक आहे, याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने प्रकरण हाताळले आहे, ते पाहता आयोग बरखास्त केला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पूर्वनियोजित कट करत त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. त्यामुळे एका गोष्टीमुळे मी नक्कीच भाग्यवान आहे, बाळासाहेब आणि माँच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य त्यांना मिळालेलं नाही. आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत. आज ही परिस्थिती शिवसेनेवर लादली, अशीच परिस्थिती देशातल्या इतर कोणत्याही पक्षावर ते लादू शकतात. आणि आताच याचा मुकाबला केला नाही, तर कदाचित येत्या २०२४ची लोकसभेची निवडणूक ही शेवटची ठरेल. कारण त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, असा आरोप केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी केला.

आयोगाने दिलेला निकाल हा अयोग्य आहे, कारण जो घटनाक्रम घडलेला आहे. त्यानुसार निकाल अपेक्षित आहे. आमदाराच्या अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. असे असल्याने, आयोगाला आम्ही या प्रकरणी निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी आम्ही केली होती. ज्या पद्धतीने आयोगाने निकाल दिला, त्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. याप्रकरणी उद्या सुनावणी व्हावी, अशी मागणी केली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आत्ता शेवटची आशा सुप्रीम कोर्टाकडून …

निवडणूक आयोगानेच दोन गट मान्य केले आहेत. त्यांना वेगळं चिन्ह आणि आम्हाला वेगळं चिन्ह दिलं आहे. पण त्या गटाला त्यांनी नाव आणि चिन्ह दिलं आहे, यामुळे आमचा आणि त्यांचा संबंध नाही. त्यांचा व्हिप लागू होत नाही. त्यामुळे पक्षनिधीचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आता शेवटची आशा आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply