शिवजन्मोत्सव निमित्त आज कार्यक्रमाची रेलचेल

Spread the love

सकाळी ९ वाजता पालखी सोहळा

महापुरुष जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी सोहळा आयोजित केला आहे. आज (रविवारी) सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा पालखी सोहळा निघणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान चौक मार्गे झेंडा चौक येथे जाणार आहे.


या कार्यक्रमाचे उद्घघाटन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासानी हे करणार असून अध्यक्षस्थानी मंगलनाथ मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कानडे हे राहणार आहेत. आम्ही जिजाऊंच्या लेकी … जिजाऊ जन्मोत्सव समिती यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा होणार आहे. तरी या पालखी सोहळ्यात शिवप्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

रक्तदान शिबीराचे आयोजन

पाटील साहेब प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज (रविवारी) सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply