माजलगावकर हो … चला बहिणीच्या लग्नात राबायला चला !

Spread the love

उद्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात २१ विवाह पार पडणार

माजलगाव दि.१८: माजलगाव शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने उद्या दि.१९ रविवारी साय.७ वाजता सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पडणार आहे. बहिणीच्या विवाह सोहळ्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे म्हणत संयोजन समितीने माजलगाव शहरात व्यापारी, नागरिकांना अक्षदा वाटप केला आहे.

माजलगाव शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ताकट व समितीने आयोजित केलेला हा सोहळा अतिशय नेत्रदिपक होत असून सोहळ्याची पूर्ण तयारीही झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या समाज उपयोगी शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी. संयोजक बाळु ताकट व सदस्यांनी घेतलेले शेतकरी, शेतमजुराचे व संकल्प केला. मागील आठ वर्षापासून सर्वधर्मीय विवाह पार पाडतात. त्याच नुसार यावर्षी २१ सर्वसामान्यांच्या विवाह लावण्याचा विवाहाची नोंदही झाली. यामध्ये हिंदु, मुस्लिम यांच्यासह सर्व जाती-धर्मांचे विवाह दि. १९ बुधवारी सायं. ७ वाजता सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहेत. त्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे वतीने शहरात व्यापारी, नागरिकांना अक्षदाचे दोल ताशाच्या गजरात वाटप करत विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

एतिहासिक मिरवणूक ठरणार !

तत्पूर्वी शहरातील झेंडा चौक येथून भव्य शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक रविवारी दुपारी २ वाजता निघणार आहे. मिरवणुकीत बाहुबली हनुमान, ढोल पथक, संबळ वाद्य पथक, हलकी पथक, झेंडा पथक, नगारा वाद्य पथक, मर्दानी खेळाची चित्तथरारक पथक प्रथमच माजलगावकराना पाहण्यास मिळणार आहे.

Leave a Reply