शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार – आ.प्रकाश सोळंके

Spread the love

राष्ट्रीय महामार्गावर रा.कॉ. एक तास रास्ता रोको आंदोलन

माजलगाव : सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. तात्काळ सोयाबीन १० हजार तर कापसाला १२ हजार प्रती क्विंटल भावाने खरेदी करावी. शेती पंपाची सक्तीची वसुली थांबवावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, आमदार प्रकाश सोळंके यांनी शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावरील वसंतराव नाईक चौक (परभणी फाटा) येथे आयोजित रस्ता रोको आंदोलन प्रसंगी केले.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील वसंतराव नाईक चौक (परभणी फाटा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार प्रकाश सोळंके हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक झालेले पहावयास मिळाले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, सोयाबीन पिकास प्रति क्विंटल १० हजार रू., शेतकऱ्यांच्या कापुस पिकास प्रति क्विंटल १२ हजार रू भाव देवुन खरेदी करावा. शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विज कनेक्शन न तोडता सक्तीची वसुली थांबवावी. शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केलेले सुरू करावीत. अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकऱ्यांचे अनुदान त्वरीत बँक खात्यात जमा करावीत. एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेली धान्य पुर्वरत सुरू करण्यात यावे आदी मागण्या मांडल्या. या मागण्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

– मुख्यमंत्री केसीआर यांचे कौतुक

आमदार प्रकाश सोळंके यांनी आज रस्ता रोको आंदोलन प्रसंगी जाहीर पणे तेलगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे कौतुक केले. आठ वर्षात स्वतंत्र राज्य म्हणून उदयास येऊन शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी यासह अनेक महत्वकांक्षी योजना त्यांनी राबवले आहेत. मात्र महाराष्ट्रात हे का शक्य नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply