जिल्ह्यात प्रथमच २५ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर साकारली शिवरायांची रांगोळीतून प्रतिमा

Spread the love

उद्या होणार शिवप्रेमीसाठी खुली – बाळु ताकट

माजलगाव, दि.१७: बीड जिल्ह्यात प्रथमच माजलगाव शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा २५ हजार स्क्वेअर फूट भागावर रांगोलीमध्ये साकारली जात आहे. उद्या (शनिवारी) ही पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती शिवजन्मोत्सव अध्यक्ष बाळु ताकट यांनी केले आहे.

शिवजन्मोत्सव समिती माजलगावच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात सामूहिक विवाह सोहळा, भव्य मिरवणूक होणार आहे. तसेच शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा २५ हजार स्क्वेअर फूट भागावर रांगोळी मधून साकारली जात आहे. ही रांगोळी कलाकार परभणी येथील कैलास राखोंडे, मिथुन आडे, अंबिका गायकवाड, वैष्णवी पांचाळ, मारोती भैरट, केशव वरणे, अनुष्का चंदेल, गणेश शेजुळ हे कलाकार परिश्रम घेत आहेत. ही शिवरायांची प्रतिमा शिवप्रेमीसाठी उद्या दि.१८ शनिवारी दुपारी ४ वाजता पाहण्यासाठी खुली करण्यात येणार असून नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट यांच्यासह समितीच्या वतीने केले आहे.

Leave a Reply