माजलगाव : माजलगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या महावितरणकडून होत असलेल्या शेती पंपाच्या तोडणी विरोधासह विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन आयोजित केले आहे. हे आंदोलन आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी १०.३० वाजता वसंतराव नाईक चौक (परभणी फाटा) येते रस्त्यावर उतरणार आहेत.
आमदार प्रकाश सोळंके हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विंटल १० हजार रू. भाव देवुन खरेदी करावी. शेतकऱ्यांच्या कापुस पिकास प्रति क्विंटल १२ हजार रू भाव देवुन खरेदी करावा. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये. शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केलेले सुरू करावीत. अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकऱ्यांचे अनुदान त्वरीत बँक खात्यात जमा करावीत. शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान 50 हजार रू. बँक खात्यात जमा करावीत. शेतकऱ्यांची दोन लाखाच्या पुढील थकीत रक्कमेची कर्ज माफी देण्यात यावी. एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेली धान्य पुर्वरत सुरू करण्यात यावे, आदी मागण्यासाठी आ.सोळंके यांनी राष्ट्रीय महामार्गावर वसंतराव नाईक चौक (परभणी फाटा) येथे उद्या दि.१७ शुक्रवारी १०.३० वाजता रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात शेतकरी बांधवासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष जयदत्त नरवडे यांनी केले आहे.