बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदाराने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोफ्यस्पोट केला आहे. मतदाराची इच्छा असेल तर मी भाजपच नव्हे तर शिंदे गट किंवा तेलंगणाचे केसीआर यांच्या पक्षात ही जाऊ शकतो असे सागितले.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी सुंदरराव सोळंके महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा, शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अतिवृष्टी अनुदान तात्काळ अदा करावे, शेतकऱ्यांचे होल्ड खाते उघडावे आदी मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १७ फेब्रुवारी करण्याबाबत माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी आपण भाजपमध्ये जाणार का ? अशा चर्चा आहेत. त्यावर मिश्किल हास्य करत आ.प्रकाश सोळंके म्हणाले, माझ्या मतदारांची इच्छा असेल तर भाजपातच का ? शिंदे गट किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात ही जाऊ शकतो. केसीआर यांनी शेतकरी यांच्यासाठी मोफत पाणी, वीज तर इतर अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मी यापैकी कुठल्या ही पक्षात जाऊ शकतो असे सांगितले.