माजलगाव : आमदार प्रकाश सोळंके अशात जनतेसह सामन्याच्या प्रश्नावर खूपच गंभीर झाले असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यातच आज (सोमवारी) उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आ.सोळंके यांनी दिला आहे.
१) शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विंटल 10 हजार रू. भाव देवुन खरेदी करावी.
२) शेतकऱ्यांच्या कापुस पिकास प्रति क्विंटल 12 हजार रू भाव देवुन खरेदी करावा.
३) शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये.
४) शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केलेले सुरू करावीत.
५) अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकऱ्यांचे अनुदान त्वरीत बँक खात्यात जमा करावीत.
६) शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान 50 हजार रू. बँक खात्यात जमा करावीत.
७) शेतकऱ्यांची दोन लाखाच्या पुढील थकीत रक्कमेची कर्ज माफी देण्यात यावी.
८) एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेली धान्य पुर्वरत सुरू करणे.
या मागण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. अन्यथा दि.१७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.