माजलगाव : वडवणी ते तेलगाव रोडवर दुचाकी स्वारांची धडक गॅस टाक्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला झाली. यामध्ये दोन विध्यार्थी गंभीर मार लागून पडल्याची घटना आज ११ वा. च्या दरम्यान घडली. या अपघात ग्रस्तांच्या मदतीला जयसिंग सोळंके धावले व त्या दोघांना स्वतःच्या गाडीत टाकून उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
याबाबत माहिती अशी की, वडवणी -तेलगाव रोडवर तेलगाव जवळ दोन दुचाकीस्वार हे गॅस टाक्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता धडकले. यात दुचाकीवरील प्रेम मसू प्रमाळे (वय १६) रा.बीड, प्रतिक गणेश वरपे (वय १६) रा.बीड हे
गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना मदतीसाठी १० ते १५ मिनिट झाले तरी कुणी थांबत नव्हते. तेवढ्यात जिल्हा परिषदचे माजी सभापती जयसिंग सोळंके हे वडवणीहून तेलगावकडे येत असताना अपघात झालेला दिसला. त्यांनी तात्काळ स्वतः ची गाडी थांबून त्या अपघात ग्रस्त विद्यार्थ्यांना गाडीत टाकून उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी जयसिंग सोळंके यांनी प्रकृतीची विचारपूस करत प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले. युवा सेनेचे अभिजित कोंबडे, अशोक लांडगे सह कार्यकर्ते उपस्थित होते.