माजलगाव : शेतकऱ्यांची तूर ही आधारभूत भावाने विक्री करण्यासाठी नाफेड मार्फत ॲड.रामराव नाटकर कृषीनिविष्ट सहकारी संस्थेकडे खरेदी केंद्र दिले आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी रयत अर्बन येथे नोंदणी करावी, असे आवाहन चेअरमन अमित नाटकर यांनी केले आहे.
माजलगाव तालुक्यातील तूर खरेदीसाठी ॲड.रामराव नाटकर कृषिनिविष्ट सहकारी संस्था,माजलगाव हंगाम २०२२-२३ मध्ये मान्यता दिली आहे. या खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधार भूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हमीभावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी रयत अर्बन, जुना मोंढा माजलगाव येथे नोंदणी करून घ्यावी. तूर हमी भाव ६६०० रुपये असून हेक्टरी मर्यादा 8 क्विंटल आहे. शेतकऱ्यांचा FAQ दर्जाचा माल घेण्यात येणार आहे. शेतकरी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून शेतकऱ्याने आधार कार्ड, ७/१२ उतारा पिकपेरा व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हि सर्व कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी तूर या पिकाची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन ॲड. रामराव नाटकर कृषिनिविष्ट सहकारी संस्था माजलगाव चेअरमन अमित नाटकर यांनी केले आहे.