जिल्हा पोलीस दलात खळबळ
माजलगाव : माजलगाव मतदार संघातील अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्याकडे गुरुवारी केली आहे. यामुळे बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी गुरुवार (दि.९) थेट पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पत्र देऊन अवैद्य बंद करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, माजलगाव मतदारसंघातील माजलगाव ग्रामीण व शहर, पोलिस स्टेशन धारूर, पो.स्टे. वडवणी, पो.स्टेशन दिंद्रुड, पो.स्टे. सिरसाळा या पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे, ज्यात गावठी दारू, गुटखा, जुगार, मटका, अवैद्य प्रवासी वाहतुक, वाळु चोरी, अवैद्य बनावट, दाऊ विक्री मोठ्या प्रमाणात सर्रासपणे चालु असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रस्त्याच्या बाजुने विविध ठिकाणी धाब्यावर सर्रासपणे दाऊ विक्री केली जाते. धाब्यावर दाऊ पिऊन जाणाऱ्या अनेक व्यक्तींचे अपघात होवुन मृत्यू झालेला आहे. त्याच बरोबर शासकीय धान्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. यावर कठोर कारवाई करत हे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत. माजलगाव मतदारसंघातील 6 पोलिस अप्पर पोलिस अधिक्षक, अंबेजोगाई, उपविभागीय पोलिस अधिकारी, माजलगाव व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी यांना आदेशित करावे, अशी मागणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे आ.प्रकाश सोळंके यांनी पत्राद्वारे केली आहे.
