लव्ह जेहाद,धर्मांतरण विरोधी कायदा संपूर्ण देशभरात लागू करण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी रविवार दि. 4 माजलगावात हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देश देशभरात लव्ह जेहाद व धर्मांतराच्या मोठ्या घटना उघडकीस आल्या. वसई येथील श्रद्धा नावाच्या एका हिंदू मुलीचे लव्ह जेहादच्या प्रकरणातून हत्या करून तिचे पस्तीस तुकडे करण्यात आले या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली श्रद्धाच्या घटनेतून बोध घेऊन इथून पुढे लव्ह जेहाद व धर्मांतरनाच्या घटना घडू नये या साठी लव्ह जिहाद व धर्मांतरन कायद्याची कठोर अमलबजावणी होणे आवश्यक आहे या प्रमुख मागणीसह देशभरात हिंदूंचा आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून दिसत आहे. गेल्या काही दिवसां पासून देशाच्या विविध भागात भव्य मोर्चे निघाले असून हिंदू समाजाच्या तीव्र भावना सरकारने समजून कठोर कायद्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे
माजलगाव शहरात रविवार दि.4 रोजी सकाळी 10 वा. शहरातील हनुमान चौक भागातून मोर्चा निघणार असून छत्रपती संभाजी महाराज चौकात तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार आहे.सदरील मोर्चात विध्यार्थी,डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती असणार आहे.तरी सदरील मूक मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाज माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे.