शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी !

Spread the love

मानधन वाढीत होणार दुपटीने वाढ 

अत्यंत तुटपुंज्या मानधनावर शिक्षण सेवक हे काम करत होते. याबाबत अनेक वर्षापासून मानधनात वाढ करण्याची मागणी होती. अखेर राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलत मानधन वाढीचा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला मानधन वाढीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी ठेवला आहे.

सध्या प्राथमिकसाठी केवळ ६ हजार, माध्यमिकसाठी (सहावी ते आठवी) ८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी (अकरावी ते बारावी) ९ हजार एवढे तुटपुंजे मानधन मिळते. यामुळे शिक्षक संघटना, शिक्षण सेवक, लोकप्रतिनिधी यांच्याकडून मानधन वाढीची मागणी होत होती. याची दखल घेत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला मानधन वाढीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे दाखल केला आहे. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल. त्यानंतर प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिक पातळीवर १८ हजार तर उच्च माध्यमिक पातळीवर २० हजार इतके मानधन मिळणार आहे. शिक्षण सेवकांना पहिल्या ३ वर्षांच्या परिक्षाविधीन काळासाठी हे मानधन दिले जाते.

जाहिरात …

 

Leave a Reply