माजलगाव झटपट बातम्या

Spread the love

🏥 माजलगाव ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य व रक्तदान शिबीर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त माजलगाव ग्रामीण रुग्णालयात गुरुवार दि.९ रोजी महाआरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डॉ.गजानन रुद्रवार यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत माजलगाव ग्रामीण रुग्णालय येथे महाआरोग्य व महारक्तदान शिबीराचे आयोजन गुरुवार दि.९ रोजी करण्यात आले आहे.
या शिबीरात तालुक्यातील गरजू नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.गजानन रूद्रवार यांनी केले आहे.

🚌 माजलगाव वाघोरा बस सुरू करा

माजलगाव ते वाघोरा एस टी बस सेवा सुरळीत सुरू करण्यात यावी. एस टी बस सतत माजलगाव आहारातून अचानक बंद करण्यात येते. त्यामुळे या भागातील विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याकरिता माजलगाव परिवहन मंडळाचे आगारप्रमुख यांची भेट घेऊन निवेदनद्वारे अजयसिंह दिलीपराव राऊत यांनी केली आहे.
अन्यथा सर्व विद्यार्थांसह दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी माजलगाव बसस्थानक आगारात चक्काजाम आंदोलन करण्यात इशारा दिला आहे.

🌊 माजलगाव धरणातून शेतीसाठी पाणी सोडा – ऍड. गोले

माजलगाव धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे. जेणे करून माजलगाव तालुक्यासह परळी, गंगाखेड, पाथरी शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी उपलब्ध होईल. सध्या शेतातील ऊस, गहू, भुईमूग, सोयाबीन आदी पाण्याखालील पिके घेतात. वेळेत पाणी सोडल्यामुळे पिके धोक्यात असून प्रशासनाकडून तात्काळ व वेळेवर नियमित पाणीपुरवठा न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे भाई ऍड. नारायण गोले पाटील यांच्यासह मुंजा पांचाळ, अजित जगताप, विष्णू शेळके, लक्ष्मण वाळस्कर, मुकेश शेरकर, अण्णासाहेब मस्के, राहुल सोळंके आदींनी दिला आहे.

Leave a Reply