शेतकऱ्यांनी पशुधन, शेती साहित्य कालव्यातून काढावे
माजलगाव : माजलगाव धरणातून शेतीसाठी उजव्या कालव्याद्वारे आज दुपारी २ वाजता पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे. कालवा क्षेत्रात येणाऱ्या पशुधन व शेती साहित्य घेण्यात यावे असे आवाहन केले आहे.
माजलगाव धरणातून आज (बुधवारी) दुपारी २ वाजता उजवा कालव्याद्वरे पाणी सोडण्यात आले आहे. कळवा हद्दीत येणाऱ्या ढोरगाव, आनंदगाव, हिंगणवाडी, लोणगाव, पाथरूड, जीवनापूर, उमरी, सिमरी, पारगाव, मोगरा, लोणगाव, पाथरूड हद्दीतील माजलगाव कालव्यातून सुरुवातीस 400 क्युसेकने व दुपारी 3 वाजता 200 क्यूसेकने वाढ करून असा एकूण 600 क्यूसेक विसर्ग सोडला जाणार आहे. या कार्यक्षेत्रात येणाऱ्या संबंधित गावचे ग्रामस्थ यांना आपल्या स्तरावरून कॅनाल मध्ये कोणत्याही कारणास्तव उतरू नये, तसेच ग्रामस्थांना पशुधन व ईतर साहीत्य काढून घेण्याचे आवाहन माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वै. चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.