माजलगाव : तालुक्यातील लहामेवाडी येथील तीन युवकांचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्या अपघात ग्रस्त कुटुंबाला फुल न फुलाची पाकळी … म्हणून आज (सोमवारी) आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेऊन बंद लिफाफ्यात आर्थिक मदत करून शासकीय मदत मिळून देण्याची ग्वाही दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील युवक लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३६), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३०) व आण्णा बळीराम कटके (वय २७) या तरुणांचा कामावरून परतत असताना दि.१ रोजी स्विफ्ट कारने धडक दिल्याने दुर्देवी मृत्यू झाले होते. तसेच गावातील लहामेवाडी येथीलच भरत गायकवाड ह्या तरुणाचा ही रंगरंगोटी करताना अपघाती मृत्यू त्याच दिवशी झाला होता. घरातील करते धरते असणारे कमवते युवक असे काळाने हिरावून नेल्याने कुटूंब उघड्यावर पडले. याची आमदार प्रकाश सोळंके यांनी दखल घेत सोमवार दि.६ रोजी लहामेवाडी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन आधार देत बंद लिफाफ्यात आर्थिक मदत केली. तसेच या प्रसंगी शासकीय योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून कुटूंबाने खचून न जाता कसलीही मदत पडल्यास या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे हक्काने या असे आश्वासन दिले.
जाहिरात …