माजलगावचे पीआय फराटे, कोळी यांच्या बदल्या ; हे आले नवे अधिकारी !

Spread the love

माजलगाव: पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिक्षक मतदार संघाची निवडणूक संपताच जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात माजलगाव शहर, माजलगाव ग्रामीण व दिंद्रुड येथील ठाणे प्रमुखांच्या बदल्या झाल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी
माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांची बदली गेवराई येथे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांची पिंक मोबाईल पथक माजलगाव उपविभाग येथे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांची पेठ बीड ठाणे, पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांची सायबर पो. स्ट.बीड येथे झाली आहे. तर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांची अंबाजोगाई ग्रामीण येथे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे यांची शिवाजीनगर बीड येथे, तसेच दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रमुख प्रभा पुंडगे यांची पिंक मोबाईल पथक, केज उपविभाग येथे झाली आहे.

आलेले अधिकारी …
सायबर पो. ठा. येथून माजलगाव शहर ठाण्यास शितलकुमार बल्लाळ ठाणे प्रमुख म्हणून तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास सावंत हे अंबाजोगाई ग्रामीण येथून शहर ठाण्यात आले आहेत. तर माजलगाव ग्रामीण ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हे युसूफ वडगाव येथून आले आहेत. तसेच दिंद्रुड पोलीस ठाण्यास ठाणे प्रमुख म्हणून आण्णाराव खोडेवाड हे आले आहेत.

जाहिरात..

Leave a Reply