राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चक्क पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना निवृत्ती महाराज इंदोरीकरांना इशारा दिला. मात्र ‘त्या’ केलेल्या विधानाने उपस्थितात एकाच हशा पिकला.
पुणे येथे कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, काँग्रेस पक्षाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थीत होती.
याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले, माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली पुढे काम असल्याने संधी मिळाली नाही. मात्र, मी त्याना ऐकण्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो, असे शरद पवार यांनी म्हणताच, त्यांच्या हजरजबाबी बोलण्यामुळे कार्यक्रमात उपस्थित लोक पोट धरून हसू लागले.