काळजी घ्या; राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढणार!

Spread the love

राज्याला काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे. परभणीचे तापमान 8.2 अंश सेल्सिअसवर, औरंगाबादचे तापमान 9.6 अंश सेल्सिअसवर, नागपूरचे तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर आले आहे. यासोबतच पुण्याचे तापमान 10.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून पुढील काही दिवसात हा पारा आणखी खाली जाऊन थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडी गायब झाल्यानंतर दाट धुके पसरले होते. त्यापूर्वी बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचं दिसलं. मात्र, आता उत्तर भारत आणि राजस्थानामध्ये थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठणार असून सध्या उत्तर भारत व राजस्थानमध्ये वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान घसरले आहेत. त्यात परभणी 8.2, नागपूर – 9.4, औरंगाबाद – 9.6, यवतमाळ – 10.0, पुणे – 10.3, अमरावती 10.5, अकोला – 10.6, गोंदिया 10.8, वर्धा 11.2, नाशिकचे तापमान 11.3, चंद्रपूरचे तापमान 11.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

Leave a Reply