शेतकऱ्यांनी लढा जिंकला; पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळणार !

Spread the love

कापसाचे वायदे पुन्हा सुरु होणार

कापसाचे वायदे बंद झाल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांनी मुंबईतील सेबीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळालं असून येत्या काही दिवसात कापसाचे वायदे सुरु होणार आहेत. यामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळणार आहे.

देशात कापसाच्या वायद्यांवर घातलेली बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘सेबी’ने अंतर्गत कार्यरत ‘पीएसी’च्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कापसाचे वायदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून वायदे सुरू होण्यास आता किमान ८ ते ९ दिवस लागणार आहेत, अशी माहिती ‘एमसीएक्स’ कापूस कमीटीचे सदस्य दिलीप ठाकरे यांनी दिली. कापसावरील वायदे बंदी तात्काळ हटविण्यासाठी शेतकरी संघटनेने मुंबईतील ‘सेबी’च्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले होते. मागील महिन्यात पार पडलेल्या ‘पीएसी’च्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अँग्रोस्टारचे दिलीप ठाकरे यांनी पीएसी’ची पुन्हा बैठक बोलावत, या बैठकीत दिलीप ठाकरे आणि कॉटनगुरू डागा यांनी कापसावरील वायदे बंदी हटविण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावर पीएसी’चे अध्यक्ष पी. राजकुमार, कोटक, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष राजपाल यांनी वायदे बंदी हटविण्याच्या समर्थन देत आपली मत मांडलं. देशातील जिनिंग प्रेसिंग आणि सूत गिरणी संघटनांच्या प्रतिनिधींनीही या मागणीला समर्थन दिले होते. त्यामुळे या बैठकीत वायदे बंदी हटविण्याचा निर्णय घेतला गेला.
वायदे बंदी उठवल्याने येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या पांढर सोन असणाऱ्या कापसाला झळाळी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply