भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची मुंबई येथे ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे भेट घेऊन तब्यातेची चौकशी केली.
आमदार धनंजय मुंडे यांचा चार पाच दिवसांपूर्वी परळीत अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. धनंजय यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धनंजय यांना आणखी काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी राहावं लागणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भाजप नेत्या आणि धनंजय यांच्या बहीण पंकजा मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत तब्यतेची चौकशी करत भेट घेतली.