माजलगावात कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना पकडले

Spread the love

SDM नीलम बाफना खाता खाता भरल्या ताटावरून झाल्या फरार

माजलगाव, दि.२४: येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड एसीबी अधिकाऱ्यांनी तीस हजाराची लाच घेताना बुधवार रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आले. यावेळी कार्यालयात बसलेल्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना जेवता जेवता फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

माजलगाव विभागीय कार्यालतील कारकुन वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते. पकडलेली वाळूची गाडी सोडण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेतांना पकडण्यात बीड एसीबीच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले असल्याचे सांगितले जात आहे.
         ही कारवाई झाली तेव्हा येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना या आपल्या कार्यालयात जेवण करत होत्या. ही माहिती मिळताच नीलम बाफना भरल्या ताठा वरून खाता खाता  उटुन पळत गेल्या व खाली असलेल्या जीप चालकाच्या मोटरसायकलवर पळून जाण्यास यशस्वी झाल्या असल्याचे या ठिकाणी असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply