माजलगाव, दि.१०: माजलगाव – तेलगाव रोडवर पात्रुड जवळ दुचाकी स्वाराच्या गाडीचे टायर रोडच्या पडलेल्या भेगा मध्ये अडकल्याने दुचाकी स्वार रोडवर पडल्याने त्याच्या अंगावरून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण जखमी झाल्याची ही घटना आज (बुधवारी) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली.
खामगाव- पंढरपूर हा पालखी महामार्ग असणाऱ्या माजलगाव ते तेलगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्याला भेगा नव्हे तर अक्षरशः भगळी पडलेल्या आहेत. या भागांमध्ये दुचाकी स्वरांची टायर अडकून अनेक अपघात होत असून मागील महिनाभरात चार पाच नागरिकांचा बळी गेला आहे. त्यातच आज दि.१० बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सोन्नाथडी येथील गजानन मारुती वगरे व बळीराम मारुती वगरे हे तेलगाव कडून माजलगावकडे येत असताना पात्रुड जवळ दुचाकीचे पाठीमागील टायर भेगा मध्ये अडकले. ह्यात दुचाकीवरून पडले त्याच वेळी दुर्देवाने माजलगावकडून – तेलगावकडे जात असलेले ट्रॅक्टर गजानन मारुती वगरे (वय ३६ वर्षे) यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे चुलते बळीराम मधुकर वगरे हे जखमी झाले आहेत. गजानन मारुती वगरे यांच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. ट्रॅक्टर चालकावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Advt