लिंबुनीच्या झाडाचे सरण रचुन आत्मदहन करणार – भाई ॲड. नारायण गोले पाटील
माजलगाव, दि.३१: शासनाच्या फळबाग धोरण व नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोध करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकऱ्याने अडीच एककर लिंबुनी पीक भुई सपाट केले आहे.
माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकरी रामभाऊ नारायण गोले पाटील यांच्या कुटुंबांनी गेल्या दहा वर्षापुर्वी लिंबुनीची बाग लावली होती. गेल्या दहा वर्षांत बागेचा सांभाळ करुण बाग मोठी केली. परंतु गेल्या तीन वर्षांपासून अस्मानी संकटाचा सामना करताना शासनाने कधीही नुकसान भरपाई दिली. नाही. तसेच बाजार समितीने फळबागांचे बिट चालु करण्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक आंदोलने करुनही बाजार समितीने जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे नाविलाजाने खाजगी बिटात दहा टक्के कमिशन घेऊन व्यापारी चालवतात. त्यांना माल विक्री केली त्यामुळे नगण्य उत्पन्न होत असल्याने शेतकरी हतबल झाले. त्यातच एप्रिल महीन्यात वादळ वार्याने प्रचंड नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली त्याच्या बातम्या टीव्ही वर आल्यानंतर तहसिलदारांनी पंचनाम्याचे नाटक केले, पण कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदन देऊन दि.२७ मे पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यास लिंबुनीची बाग उध्वस्त करण्याचा इशारा दिल्यानंतरही शासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज (दि.३१) बुधवारी शासनाच्या उदासी धोरणाला कंठाळुन शासनाच्या नावाने बोंबा मारुण अडीच एकर लिंबुनीची बाग उध्वस्त केली. तसेच दि. ३ जुन २०२३ रोजी दुपारी १२ वाजता लिंबुनीच्या झाडाचे सरण रचुन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे.