भारत राष्ट्र समितीच्या माजलगाव विधानसभा समन्वयकपदी शहाजी सोळंके

Spread the love

माजलगाव, दि.२३: भारत राष्ट्र समितीच्या माजलगाव विधानसभा समन्वयकपदी येथील शहाजी सोळंके यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे नेते प्रा.प्रदीप सोळंके, जिल्हा समन्वयक दिलीप गोरे यांनी सोळंके यांचा सत्कार केले.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचे पायेमुळे घट्ट करण्यासाठी संघटन बांधणी सुरू केली आहे. त्यानुसार सोमवार दि.२२ रोजी बीड येथे भारत राष्ट्र समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यात संघटन बांधणी करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी निवडी केल्या. त्या अनुषंगाने माजलगाव विधानसभा समन्वयकपदी माजलगाव येथील युवा नेते शहाजी सोळंके यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे नेते प्रा. प्रदिपदादा सोळंके, जिल्हा समन्वयक दिलीप गोरे, प्रा.शिवराज बांगर, माधव जाधव, कुलदीप करपे यांची उपस्थिती होती.
या निवड प्रसंगी बोलताना शहाजी सोळंके म्हणाले, भारत राष्ट्र समिती पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यास मी सर्वोतोपरी पक्षाचे विचार जनसामान्यत पोहचून संघटन मजबूत करणार आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी यांच्या प्रश्नावर कायम आवाज उठवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे मत व्यक्त केले.
शहाजी सोळंके यांच्या निवडीबद्दल माजलगाव तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply