१५ जागेसाठी ३१ अर्ज; २८ जणांनी घेतली माघार
माजलगाव, दि.११: येथील खरेदी विक्री संघ निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज (मंगळवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले असून या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्यासमोर भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी एकत्र येत कडवे आव्हान उभे केले आहे.

माजलगाव खरेदी-विक्री संघावर आ.प्रकाश सोळंके यांचे मागील १५ वर्षापासून एकहाती सत्ता आहे. यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकीत मात्र भाजपाकडून मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी पॅनल उभे करून राष्ट्रवादीचे आ.सोळंके यांना शह देण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. आज दि.११ मंगळवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात दोन्ही बाजूंनी मिळून ५९ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी २८ जणांनी निवडणुकीतून मागत घेतल्याने आत्ता १५ जागेसाठी ३१ उमेदवार मैदानात राहिले आहेत. उद्या दि.११ बुधवारी चिन्ह वाटप करण्यात येवून दि.२३ एप्रिल २०१३ रोजी मतदान होवून लगेच मतमोजणी केली जाणार आहे. भाजप- राष्ट्रवादीत सरळ चुरशीची लढत होणार असल्याने तालुक्याचे लक्ष या निवडणुका कडे लागले आहे.
भाजपचे उमेदवार –
संस्था मतदार संघ-
कदम अशोक नरहरी, चव्हान धोंडीराम गणेश, जगताप गणपत बाबासाहेब, जाधव विठ्ठलराव दादाराव, पवार शंकर गोपीनाथ, बोचरे विश्वभर मोकिंद, वाघमारे दिलीप हरिभाऊ
वयक्तिक सभासद मतदारसंघ –
गायकवाड मंचक संदीपान, जाधव दिपक राजेसाहेब, जाधव बालाजी आश्रुबा तर अपक्ष राऊत अजय दिलीप,
महीला प्रतिनिधी मतदारसंघ –
कोल्हे बाबई विश्वंभर, ताकट सविता ऊद्धव
विजा, भज किंवा विमाप्र मतदारसंघ –
चोरमले मोहन नारायण
इतर मागासवर्गिय –
रासवे गणेश निवृती
अनुसुचित जाती जमाती –
जाधव विश्वनाथ मुक्ताजी
राष्ट्रवादीचे उमेदवार –
संस्था मतदारासंघ –
अत्तार जमीर अमीर, कोलते शहाजी वामनराव, चालक तुकाराम सदाशिव, पाठक भालचंद्र मधुकर, बादडे संगीता बळीराम, शिंदे सत्यनारायण वसंत, सोळंके बंडू सोपानराव
वयक्तीक सभासद –
गरड हरीभाऊ मुजाजी, रांजवन लालासाहेब हरीभाऊ, शेजुळ श्रीकृष्ण सुधाकर
महीला प्रतिनिधी –
जाधव निता ज्ञानेश्वर, तांगडे सुभद्रा दताञय
विज,भज किंवा विमप्र –
हुबाले आसाराम गंगाधर
ईतर मागस –
गोबरे वैजनाथ सुभाष
अनुसुचित जाती जमाती –
खंडागळे बबन जिजा
