पथकाने कारवाई करत हजारो ब्रास वाळूसह १० केन्या, ८ ट्रॅक्टर जप्त केले
बीड, दि.११: IPS डॉ धीरज कुमार यांच्या पथकांच्या कारवायांनी अवैध्य व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सोमवारी गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवेद्य वाळू उपसा करत असलेल्या दहा के, ८ ट्रॅक्टर व एक हजारावर वाळू जप्त करण्याची कारवाई केली. यामुळे गेवराई तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड, सहायक पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माजलगाव येथील पथकाने सोमवार दि.१० रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन गेवराई हीमध्ये खामगाव- सावरगाव शिवारामध्ये गोदावरी नदी पात्रात काही इसम ट्रॅक्टर हेडला केनी जोडुन नदी पात्रातील पाण्यातुन अवैध रित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती मिळाली. यावरून IPS डॉ. धीरज कुमार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, पोलीस हवालदार अतिषकुमार देशमुख, पोलीस नाईक अशोक नामदास, पोलीस कॉन्स्टेबल गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे यांनी गोदावरी नदी पात्रातील ०८ ट्रॅक्टर, १० केन्या, अंदाजे १००० ते ११०० ब्रास अवैध रित्या उपसा केलेल्या वाळु छापा मारून जप्त केल्याची कारवाई केली आहे. मात्र यावेळी नदीपात्रातील सर्व इसम ट्रॅक्टर, केन्या इतर साहीत्या जागीच टाकुन पसार झाले. जप्त केलेले ८ ट्रॅक्टर आणि १० केन्या पोलीस कारवाईमध्ये पोलीस स्टेशन गेवराई येथे जमा केलेल्या विरुध्द महसुल प्रशासाना मार्फतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी लेखी रिपोर्ट दिलेला आहे.